विशेष प्रतिनिधी बुलढाणा:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उज्वल इतिहासाची मोडतोड आणि बागेश्वर बाबा यांनी लोकसंख्या वाढीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या उपस्थितीत अशा वाचाळ महाराजांना बोलावून महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करण्याची नेमकी कारणे काय आहेत असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमानाचे प्रतीक आहेत, ते आयुष्यात कधीही कोणासमोर झुकले नाहीत आणि कधीही वाकले नाही आणि हा महाराष्ट्र सुद्धा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकणार नाही असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. जेव्हा बागेश्वर महाराज शिवाजी महाराजांबद्दल ते थकले आणि रामदास स्वामी यांना म्हणाले जिरे टोप त्यांच्या चरणी ठेवून हे राज्य तुम्ही सांभाळा चुकीची माहिती पसरवत होते, तेव्हा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री आणि संघचालकांनी त्यांना तातडीने थांबवायला हवे होते असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर स्पष्टीकरण देताना सांगितले की बागेश्वर बाबा जे बोलले तसा कोणताही पुरावा इतिहासामध्ये उपलब्ध नाही, मात्र लोकांनी यांनी यावर प्रश्न उपस्थित केला की जर मुख्यमंत्र्यांना सत्य इतिहास माहित होता तर त्यांनी प्रत्यक्ष भाषणावेळी बाबांना रोखले का नाही. हाच सवाल आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेतून निर्माण होत असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
बागेश्वर बाबांच्या विधानांवर टीका करताना संजय राऊत यांनी त्यांच्या वयावर आणि बुद्धीवरही बोट ठेवले आहे. ते म्हणाले की हे महाराज स्वतःला काय समजतात, ते दुसऱ्यांना सल्ले देतात की चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या. तुम्हाला तीन, पाच किंवा २५ मुले जन्माला घालायची असतील तर खुशाल घाला, त्याला आमची हरकत नाही, पण ही कसली शिकवण आहे असा सवाल त्यांनी केला. एकीकडे सरकार लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करते, त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते आणि जनजागृतीचा दावा करते, मात्र दुसरीकडे अशा व्यासपीठावरून लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रचार केला जात आहे हे विरोधाभासी आहे. संतांनी प्रबोधन करायचे असते की लोकसंख्या वाढवण्याचे सल्ले द्यायचे असतात असा प्रश्न राऊत यांनी विचारला. बागेश्वर बाबांनी जर खरोखरच देशहिताचा विचार केला असता आणि असे म्हटले असते की प्रत्येकाने आपले एक अपत्य भारतीय सैन्यासाठी समर्पित करावे, तर आम्ही आणि तमाम जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले असते. अशा विधानाची देशाला गरज आहे, पण त्यांनी सैन्याऐवजी संघाचे नाव घेतले ही खेदाची बाब आहे.
संजय राऊत यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवरही निशाणा साधला. ते म्हणाले की जर अशा प्रकारचे विधान किंवा महाराजांच्या इतिहासाची मोडतोड दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याने केली असती, तर आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असते आणि त्यांनी मोठे आंदोलन उभे केले असते. मात्र आपल्याच उपस्थितीत अशा गोष्टी घडत असताना भाजप गप्प का आहे आणि या महाराजांना रोखण्याऐवजी त्यांना मोकळे रान का दिले जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पत्रकारितेच्या माध्यमातून हा विषय मांडताना त्यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्राची अस्मिता आणि महापुरुषांचा सन्मान या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अशा विधानांना वेळीच चाप लावणे गरजेचे होते, परंतु तसे न झाल्याने जनतेमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आणि अत्यंत साध्या भाषेत सांगायचे तर हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा आहे असे मत राऊत यांनी व्यक्त केले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यांच्या सौजन्याने 