पुढारी यांच्या सौजन्याने

विशेष प्रतिनिधी, बुलढाणा
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी अखेर जनतेसमोर झुकून माफी मागितली आहे. मात्र, “महाराज थकले होते” या त्यांच्या विधानावर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट अद्यापही कायम आहे. ज्या राजाने शून्यातून स्वराज्य उभे केले, त्या राजाच्या पराक्रमावर संशय घेणारे विधान करणे हा केवळ अपमान नसून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखून रामदास स्वामी यांना मोठे करायचा डाव आहे का असा सवाल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे अशा कोणत्याही स्वामींकडे छत्रपती शिवाजी महाराज गेलेले नाहीत  तसा पुरावाही नाही आणि त्यांचे गुरु शिष्य यांचे नाते सुद्धा नाही  हा सुद्धा पुरावा नाही इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त संत तुकारामांची कीर्तन ऐकायचे धीरेंद्र शास्त्री यांची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची लायकी नाही  किंवा त्यांची उंची नाही नाही श्याम मानव यांनी दिलेले आव्हान बागेश्वर बाबांनी शास्त्री यांनी स्वीकारावे जो माणूस श्याम मानवाचे आव्हान स्वीकारत नाही याचे मतलब हा बाबा खोटारडा आहे याच्या अंगात दैव शक्ती नाही सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्याचे काम हा बाबा करत आहे धीरेंद्र शास्त्री यांनी हे आव्हान स्वीकारावे नाहीतर बाबागिरी सोडून द्यावी आता जनता जागृत होत आहे अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. बागेश्वर यांना कोणी आपल्या फायद्यासाठी वापर करत असेल तर तो करावा परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महामानवांचा अपमान सहन केला जाणार नाही अशी संतापाची प्रतिक्रिया जनतेतून येत आहे
​धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानात “महाराज थकले होते” असा शब्दप्रयोग केला होता. मात्र, इतिहासाची पाने उलटली तर वेगळेच चित्र दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते अजेय राहिले. ज्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि औरंगजेबाच्या आग्रा येथील कैदेतून सुटका करून घेतली, ते राजे कधीही थकले नाहीत. त्यांनी रयतेच्या मनात आणि मावळ्यांच्या रक्तात ‘हिमतीची भावना’ अशी पेरली होती की, राजा नसतानाही हे स्वराज्य लढत राहिले.
​महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर संभाजी महाराजांसारखे शूरवीर पुत्र घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य संपेल, असा औरंगजेबाचा भ्रम होता. मात्र, शंभूराजांनी नऊ वर्षे मुघल सत्तेला पाणी पाजले. त्यांच्या बलिदानानंतरही स्वराज्याचा भगवा खाली झुकला नाही. महाराणी ताराबाई यांनी अत्यंत बिकट काळात स्वराज्याची सूत्रे हाती घेऊन औरंगजेबाच्या विशाल सैन्याला जेरीस आणले. ज्या स्वराज्यात छत्रपतींनंतरही सामान्य मावळा आणि रयतने औरंगजेबाच्या ताब्यात स्वराज्य जाऊ देले नाही, त्या स्वराज्याचे संस्थापक ‘थकले’ असे म्हणणे हा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे.
​वाढता विरोध पाहून धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली असली, तरी त्यांच्या स्पष्टीकरणावर शिवप्रेमींचे समाधान झालेले नाही. “माझा उद्देश अपमान करण्याचा नव्हता,” असे शास्त्रींनी म्हटले आहे. मात्र, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून असा प्रश्न विचारला जात आहे की, कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना असे विधान करण्याची हिंमत होतेच कशी? जर स्वराज्याचा मावळा सुद्धा कधी हिम्मत हरला नाही, तर छत्रपती हिम्मत हारतील का? हा संतप्त सवाल आज महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक विचारत आहे.
​इतिहास साक्ष देतो की, औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वराज्याला हरवण्याचे स्वप्न घेऊन दक्षिणेत आला. मात्र, तो स्वतः याच मातीत मरण पावला, पण त्याला स्वराज्य जिंकता आले नाही. ही ताकद शिवाजी महाराजांनी पेरलेल्या स्वाभिमानाची होती. अशा अजेय राजाबद्दल “जिरेटोप चरणाशी ठेवला” सारखी चुकीची माहिती पसरवणे हे चुकीचे आणि जाणीवपूर्वक आहे.
​पत्रकारितेच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास, महापुरुषांच्या बाबतीत चुकीची विधाने करून नंतर माफी मागणे हा आता एक शिरस्ता झाला आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत अशी ऐतिहासिक चूक महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. धीरेंद्र शास्त्री यांच्या माफीनंतरही, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.

Share