बुलढाणा: संपूर्ण देशात दिल्लीपासून तर आपल्या बुलढाण्यापर्यंत पाण्याचे संकट असताना बुलढाण्यात रोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. आपल्या शहरातील पिण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक लोकांचे हिताकरिता म्हणजेच शहरातील कोणीही, केव्हाही, कधीही, कोणत्याही वेळी, रात्री, अपरात्री सुद्धा बिना पाण्याचा कोणीही व्यक्ती पाण्याविना राहू नये या उदात हेतूने एक नळ एका वाळलेल्या झाडांच्या खोडाजवळ बसलेला आहे
प्रत्यक्ष व्हिडिओ पहा
व्हिडिओमध्ये दिसणारा नळ नेहमी असाच सुरू आहे लाखो लिटर रोजचे शुद्ध पाणी वाया जात आहे कारण प्रशासन शासनाने या नळाला बसवलेली तोटी लिकेज आहे पाणी रात्र दिवस हा नळ असाच चालू राहतो लाखो लिटर पाणी मात्र वाया जात आहे तरी या नळाला त्वरित तोटी बसवून तेथील जागा स्वच्छ ठेवावी जेणेकरून पाणी वाया जाऊ नये ही कार्यवाही त्वरित करावी